Tuesday, 17 March 2020

Rantanagiri Alphonso Mangoes In Pune — Surve Bandhu Ambewale

Leading Alphonso Mango Distributor in Pune and Ratnagiri. We have established Ourselves in this field since 1948.
Rantanagiri Alphonso Mangoes In Pune — Surve Bandhu Ambewale
Mango All Over The World Is Supposed To Be The Most Fascinating Fruit And In India It Is Regarded As ” The King Of All Fruits. ” Amongst All Mangoes The Alphonso . Hapus ) Variety From Devgadh/Ratnagiri is Regarded As The best variety Because Of It’s Unique Taste, It’s Aroma & Appearance.
The Alphonso — comes from a small village named Pawas situated within the Konkan belt of the Western India and which is known to produce the finest quality of the Alphonso variety. .We at Surve Bandhu Specialise In The Cultivation & Supply Of Alphonso To Hundreds of Our Satisfied Customers Since 1948.

Worldwide Delivery

Parcle Facility Available For : Dubai, UK, France, Germany, Singaopore, USA, Canada & World Wide:
» You can get all these varities at our two outlets
» COD (Cash on Delivery) for pune only

Surve Bandhu Ambewale

Tuesday, 24 November 2015

बिझनेस करताना पुरून पुरून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. - डी. एस. कुलकर्णी

माझ्या आईने मला दोन गोष्टी सांगितल्या होत्या की, बाबारे आयुष्यात कधी दोन कोट वाल्यांच्या नादी लागू नकोस. एक काळा कोटवाला, म्हणजे वकिलाच्या नादी लागू नका, कोर्टाची पायरी चढू नका आपण धंदेवाले आहोत. डोक्यावर बर्फ व तोंडात खडीसाखर ठेऊन ‘तू बाबा मोठ्या बापाचा, जाणा बाबा’ पण ती कोर्टाची पायरी नको. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, भाकरी एका जागी कधी ठेवायची नाही. तर दुसरा कोटवाला म्हणजे डॉक्टर, तुमची तब्येत खणखणीत ठेवा, लक्षात घ्या तुम्ही बिझनेस मध्ये आहात. उद्योग बिझनेस मध्ये असलेल्या लोकांनो, अरे आपल्याला आजारी पडायला परवानगी नाही रे. डॉक्टरच्या नादी कधी लागू नका याचा अर्थ तब्येत खणखणीत ठेवा.
बिझनेस करताना पुरून पुरून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. अंथरून पाहून पाय पसराही ज्या कोणी मराठी माणसाने म्हण तयार केली त्याला आपण माफ् करूया, कशाला त्याच्या नादी लागायचे. अरे व्हा ना मोठे, तुम्हाला कोणी सांगितले तुम्हाला अंथरून पांघरून मिळणार नाही म्हणून.
बाबारे मरताना डोक्यावर ५ रु सुद्धा कर्ज नको, ही दुसरी दळीद्री म्हण कोणी निर्माण केली माहित नाही. कर्ज नाही काढलं तर धंधा चालणार कुठनं. आज मुठभर जोंधळे पेरले तर पोतेभर धान्य येत. पोतेभर जोंधळे पेरले तर किती धान्य येईल हा साधा नियम आहे. आता मला सांगा स्वतःच्या घरातील जोंधळे आणून आणून तुम्ही किती आणणार, तो एक नियम आहे.
आज मी व्याख्यान द्यायला आलो आहे. आज मी इथे दमून आलो नाही, तर चिडून आलो आहे, मी आज खूप चिडलो आहे. मी स्वतः रोज माझ्या बायकोला सांगतो की जर माझे आडनाव कुलकर्णी नसतं आणि मी साला मराठी नसतो तर मी आज अंबानीला मागे टाकलं असतं. आपल्यातील जे मराठीपण आहे ना, मीच किती वेळा बोलतो पण मला सुद्धा अजून पूर्णपणे ओवरटेक करता येत नाही. मी पूर्णपणे मराठी नाही, अर्धा मारवाडी, अर्धा गुजराती व मग उरलासुरला मराठी ब्राम्हण आहे.
मी मारवाडी लोकांचा खूप मोठा भक्त आहे. हिशोबाला ते अगदी पक्के असतात. तोंडात नेहमी खडीसाखर असते. डोक्यावर त्यांच्या नेहमी बर्फ असतो. हे लोक नेहमी फ़्लेझीबल असतात, ताईसाहेब, काकासाहेब असे मधुर बोलतात. या उलट मराठी माणूस ताठ असतो व म्हणतो काय चुकले माझे बोला.
स्वतःच्या लढाया स्वतःच लढायच्या असतात, दुसऱ्यांच्या लढायांचे वर्णन ऐकताना त्याचे काय चुकले तो का पराभूत झाला, तो विजयी कसा झाला हे शोधण्यापेक्षा तो पराभूत झाला तर का पराभूत झाला, त्याच्या चुका कोणत्या हे शोधा आणि त्यातनं त्या इतिहासातून आपण आपल्या लढाया लढायच्या असतात.
आज आपण भारतासारख्या देशात आहोत, एका बाजूने आतिशय भ्रष्ट आचरणाने देश रसातळाला चालला आहे असे असताना त्याच वेळेला आपल्याकडे दुसरी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही जगात कोठेही नाही ती भारतात आहे. जगातले सर्वात जास्त तरुण आज भारतात आहेत. जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे आपल्या देशात आहेत ह्या काही आपल्या भक्कम बाजू आहेत, त्यामुळे बिझनेस करणाऱ्याला काही मरण नाही.
बिझनेस मध्ये तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखता आला पाहिजे, तुम्हाला तुमचे आयुष्य ओळखता यायला पाहिजे आणि त्याला अनुसरून बिझनेस करता यायला पाहिजे. नेहमी आपल्या कस्टमरचा अभ्यास करा. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा कोणताही बिझनेस असू द्या जर तुमचे ऑफिस असेल तर ते नेहमी स्वच्छ क्लीन नीट नेटके ठेवा यावर सुद्धा तुमच्या बिझनेसचे यश अवलंबून असत.
धंद्यामध्ये मार्केटिंग खूप महत्वाचे. धंद्यामधे विकणारा सर्वात महत्वाचा भाग असतो. जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तर काहीना काही तरी विकायची पहिल्यापासून सवय ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण तुम्हाला टकलू माणसाला सुद्धा कंगवा विकता आला पाहिजे. काहीना काही विकण्याचा आत्मविश्वास निर्माण करा मग तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.
व्यवसायात प्रेझेंटेशन सुद्धा खूप महत्वाचे. सुरवातीच्या काळात मला किर्लोसकरांनी १०० रु दिले होते, चांगले कपडे, बूट व टाय घेण्यासाठी. तेव्हापासून मित्रांनो ही टाय जी माझ्या गळाल्या लागली आहे ती अजूनही आहे. मी नेहमी कुठेही जाताना व्यवस्तिथ नीटनेटके कपडे घालून जातो. तुमचा पेहरावा असा असला पाहिजे की तुम्ही समोरच्याला आपलेसे वाटले पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व इतके स्वच्छ पाहिजे की तुमच्या वागण्या बोलण्यातून लोकांना तुमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे.
मित्रांनो विहिरीत, ओढ्यात, स्विमिंग पूल / डबक्यात किती दिवस पोहायचे? नदीकडे आपण जायला हवे व पुढे समुद्राचे ध्येय ठेवले पाहिजे. रोज तुम्हाला बिझनेसला पैसे कमी पडत असतील तर समजा तुम्ही प्रगती करत आहात, आणि जर तुमचे पैसे उरत असतील लक्षात ठेवा तुम्ही धोक्याच्या दिशेने जात आहात. दरवर्षी तुमचा १० टक्केने बिझनेस वाढलाच पाहिजे, तुमची ग्रोथ झालीच पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या असाही तसाही तुमचा दरवर्षी बेसिक Infrastructure कॉस्ट वाढणारच आहे मग तुमचा ग्रोथ रेट वाढलाच पाहिजे, आणि यासाठी तुम्हाला कर्ज घेतलेच पाहिजे. तुम्हाला तुमच्या कर्जाचा अभिमान वाटला पाहिजे. मला आज अभिमान आहे की माझ्यावर ७०० कोटींचे कर्ज आहे. या कर्ज देणाऱ्या एकूण १४ बँका आहेत व त्यातील २ अमेरिकन बँक आहेत.
आता ही पत कशी वाढवायची? जर समजा तुमचा एक व्यवसाय आहे व त्यातून तुम्हाला १०० रु मिळाले तर ते सर्व नेउन प्रथम बँकेत भरायचे. आता तुम्हाला तुमच्या व्यवसायचा माल आणण्यासाठी २० रु लागत आहेत, तर ते आता तुमच्या बँकेतील १०० रु मधून २० रु काढा. जेवढे तुमचे बँकेत पैसा जातो तेवढा तो तुमचा टर्नओवर मानला जातो. तुम्ही किती पैसा काढता यापेक्षा किती भरता याला महत्व आहे.
मित्रांनो पेला अर्धा भरला आहे की पूर्ण, हे पाहत बसू नका. तर जे काही आहे, ते देवाने तुम्हाला खूप काही दिले आहे असा विचार करून आयुष्य पुढे न्या. काय गेले आहे त्यापेक्षा काय आले आहे याकडे पहा. माझी ज्यावेळी पेपरची लाईन होती त्यावेळी म्याट्रीकचा निकाल पेपर मधून यायचा. दुपारी जीवाच्या आकांताने ते पेपर आपल्या हातात घ्यायचे व सायकलवर टाकून ‘आला आहे एस.एस. सी. रिझल्ट’ अशी आरोळी मारत ते पेपर विकायचे. १० मिनिटांमध्ये लोक जास्त पैसे देऊन विकत घ्यायचे व व ते पेपर पटकन
संपायचे. सगळे अंक १० मिनिटांमध्ये संपून माझ्याकडे एक मोठी चिल्लर जमा व्हायची. ४० रु डाव्या खिशात व ४० रु उजव्या खिशात टाकून मी रुबाबात चालायाचो. ते ८० रु चे जे सुख आहे ते आज ४००० कोटी रु यात मला मिळत नाही. सुख नेमके कशात मानायचे ते मित्रांनो लक्षात घ्या. तुम्हाला समाधान कशात मानायचे हे कळले ना मग पुढे कुठेही त्रास होत नाही.
मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांकडे एक मोठी गोष्ट आहे, एक मोठी ताकद आहे ती म्हणजे विश्वासहर्ता. मराठी माणसाचा विश्वासहर्ता हा मोठा गुण आहे, हाच मोठा आपला ब्रन्ड आहे. लोक इतर काहीही म्हणतील की त्याला धंधा करायला येत नाही, त्याच्याकडे व्यवसायाची समज कमी आहे. हा पण तो मराठी माणूस आहे व तो चोर नाही. अरे हा मराठी माणूस आहे याच्याकडून वस्तू विकत घ्यायला हवी कारण हा कधी फसवणार नाही. मग तुमच्याकडे जर हा इतका मोठा प्लस पॉईन्ट आहे तर तो इनक्याश करा. इथे जरूर गर्वाने बोल की आम्ही मराठी आहोत.
सुरवातीला अनेक छोटे छोटे व्यवसाय करताना मला या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. लहानपणी भाजी विकताना ग्राहक जेव्हा भाजी घ्यायला यायचे तेव्हा माझ्या काकांना सांगायचे की त्या लहान मुलाच्या (म्हणजे माझ्या) हातात तराजू द्या, कारण तो कधीही काटा मारत नाही. तुमच्या तराजूचा काटा हा नेहमी ग्राहकाच्या बाजूनेच झुकलेला असायला हवा.
मी आलेली संधी कधीच सोडत नाही, असे करताना चुका होतात. पण मी त्या दुरुस्त करतो व त्यातून मार्ग काढतो. त्यावेळी पुण्यात जंगली महाराज रोडवर बांधकाम करताना अनेक नियमांमुळे बहुतेक सर्व बांधकाम अनधिकृत होत होते. मग ते महापालिका येउन पडायचे. मग मी जिद्दीने ठरवले की आपण सर्व नियमांत बसवून हॉटेल बांधायचे. मी प्रयत्न केले व सर्व अधिकृत परवानग्या घेऊन बांधकाम केले. त्यात माझे खूप नुकसान झाले, माझी खूप जागा वाया गेली. पण मी म्हटले हरायचे नाही, जिद्द नाही सोडायची. हॉटेल बांधून तयार झाले पण वर्षभर जास्त कस्टमर आलेच नाही. मग मला कमी किमतीत जागा विकण्याचे ऑफर येऊ लागले, काहींनी तर मला वेड्यात काढले. कारण त्यांना लक्षात आले की याच्याकडे कोणीच येत नाही.
मग मी विचार करू लागलो काय करायचे? मग मी स्वतःच रेस्टोरंन्ट चालू करायचे ठरवले. म्हटले डोसा इडली नाही तर मोठे स्वप्न पाहायचे. मग मी सरळ अमेरिके Macdonalad मध्ये संपर्क केला. त्यांचे अनेक वेळेला नकार आला पण मी सोडलेच नाही शेवटपर्यंत. त्यावेळी मला कोणी तरी तरी सुचवले की तू कार शो रूम चा का विचार करत नाहीस. ज्याने सुचवले त्याचे स्वतःचे कार शो रूम मी पहिले आणि माझे डोळे चकाकले. तिथून उठलो व थेट टोयाटोचे पुण्यातील हेड ऑफिस गाठले आणि टोयाटोची डीलरशीप घेऊन आलो. साहेब वडापाव आणायला गेलो आणि टोयाटो घेऊन आलो. MacDonald म्हणजे दोन पावाच्या आत वडा असतो, म्हणजे तो काय वेगळा असतो का? तो वडापावच हो. अशाप्रकारे संधी कुठे लपलेली ते असते सांगता येत नाही.
तुमच्या कस्टमरला तुमचे ऑफिस त्याचे वाटायला हवे. तुमच्या कस्टमरला तुमच्या टेबलावर येउन हात आपटून भांडण्याची मुभा असायला हवी, असे खरच करून बघा तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी आणि यशस्वीच होत जाल. माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा कोणी फोन करतात तेव्हा त्याला गाणे सुद्धा आनंद देणारे असेल याची देखील आम्ही काळजी घेतो. इतक्या बारीक बारीक गोष्टी पहा, तुमच्या कस्टमरला जिंका.
दुसरे मित्रांनो भाषेवाचून काही अडत नाही हे लक्षात घ्या. माझे स्वतःचे इंग्रजी मुळे काहीच अडले नाही. बिझनेस मद्धे जेव्हा तुम्ही पडता तेव्हा भाषेमुळे काहीच अडत नाही. मी खूप देशात फिरतो चीन, जपान, फ्रान्स यासारख्या देशात, तेथील लोकांशी बोलतो भेटतो माझे कशामुळे काहीच अडले नाही. जेव्हा जेव्हा अडचणी येतात ना तेव्हा तेव्हाच मुळात आपल्याला मार्ग सुचतात. तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे भिडून जाण्याची तयारी पाहिजे. हृदयापासून बोला तीच आपली मातृभाषा असते, त्यावेळी तुमचे डोळे बोलतात, हृदयापासून जे येते तेच कनेक्ट होते. तरुणांनो मला सांगा प्रथम पोरगी पटवताना तुम्ही डोळे मारूनच तुमच्या भावना तिला सांगता ना? तिथे सुद्धा जे हृदयातून येते तेच कनेक्ट होते. डोळ्याच्या भावना, प्रेमाच्या भावना, हृदययाच्या भावना ही बॉडीलँग्वेज आहे.
एकदा दुबईला जाताना मी विमानाने जात होतो, विमानात जाताना कोणी माझा कस्टमर नसतो म्हणून विमानाने बिझनेस क्लास मधून दुबईला जात होतो. त्या बिझनेस क्लास मध्ये तुमच्या सीट समोर टीव्ही असतात. एक हिंदी सिनेमा त्यावर लागला होता मी तो टाईमपास म्हणून पाहत होतो. शेजारी माझ्या एक फ्रेंच माणूस बसला होता तो माझ्याकडे पाहत इंग्रजीत त्याने मला विचारले 'हा जो सिनेमा आहे त्यातील ही नटी कोण आहे? तुम्ही तिला ओळखता का?
मी म्हटले मी हिला ओळखत नाही पण एका नटिला ओळखतो ती म्हणजे माधुरी दीक्षित. ती माझी पार्टनर होती ११ वर्ष ती माझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर वर होती. आणि तो एकदम उभा राहिला माझा हात हातात घेतला. अहो मी तिला आताच तर भेटण्याचा प्रयत्न करून आलो आहे. पण तिच्या सेक्रटरीने मला भेटूच दिले नाही. मी विचारले ' का असे घडले. तो इंग्रजीत म्हणाला, अहो मी फ्रेंच परफ्युमचा उत्पादक आहे आणि मला ती ब्रांन्डींग साठी हवी आहे. पण तिच्याशी मला कोणी भेटून दिले नाही.
अशा वेळेला तुम्हाला संधी ओळखता यायला पाहिजे व ती साधता यायला पाहिजे. मी त्याला म्हटले मी तिच्याशी तुझी भेट घालून देईन, मला कमिशन नको तुझ्या व्यवसायात भागीदारी दे. अशी संधी जेव्हा येते तेव्हा मोठ्या गोष्टी यातून काय घडतील ते पहा, मोठ्या स्वप्नांकडे पहा. खरेतर हि खूप छोटीशी गोष्ट आहे ओळख करून देणे पण त्यात संधी मी ओळखली. अशा प्रकारे मी आयुष्यात अनेक संधी साधल्या.
आणखी एक गोष्ट सांगतो मी वर्ल्ड इकोनॉमीचा मेंबर आहे, दर तीन महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या राष्ट्रामध्ये त्या त्या शहरात कॉन्फरन्स भरतात. आपल्या भारतातही अनेकदा या मिटिंग होतात. यावेळी सगळ्या जगातील इंडस्ट्रीयल तिथे येतात, तेव्हा तिथे त्या राष्ट्रातील पंतप्रधान, तेथील नेते सर्वांना त्यांच्या राष्ट्रातील संधी सांगतात व सर्वांना आवाहन करतात गुतंवणूक करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी. जेणेकरून त्यांच्या देशातील रोजगार वाढेल, देशात पैसे येतील.
एकदा आफ्रिकेत डरबन मध्ये ही कॉन्फरन्स होती व तिथे मी गेलो होतो. राउंड टेबल कॉन्फरन्स भरली होती आणि प्रत्येकजण काहीना काही स्पीच देत होते. माझी वेळ आली आणि का कोण जाणे मी काहीबाही बोलून गेलो, मी उठलो आणि म्हणालो इंग्रजीत ' आदरणीय पंतप्रधान मी तुमच्या देशातील गरीब लोकांसाठी दहा हजार घरे फुकट बांधून देईन. सर्वजण अचंबित होऊन माझ्याकडे बघायलाच लागले.
क्षणभर कोणीच टाळ्या नाही वाजवल्या, पण हळू हळू लक्षात आल्यानंतर एक एक जण टाळ्या वाजवू लागला. नंतर मला माझी चूक लक्षात आले की, आपण हे काय बोलून बसलो आहे. मला आपल्या मुंबई पुणेची सवय, जर मी दहा हजार झोपड्या फुकट बांधून दिल्या तर मला दहा Tower फुकट बांधायला मिळतात पुण्यात. मला तितका एफ एस आय मिळतो, माझ्यातील बिल्डर जागा झाला.
आता झालीना पंचायत, त्यांनी संध्याकाळी वेगळे बोलवून घेतले. मी त्यांना म्हणालो, कि ही डील डन झाली आहे. मी माझा शब्द खरा करून दाखवणार, मी दहा हजार घर फुकट बांधून देईन. फक्त निट समजून घ्या मी एक भारतीय माणूस आहे, मी काही चुकीचे बोलत नाही आहे. मी जे भारतात करू शकतो ते इथे ही करू शकतो.
त्यांनी विचारले काय आहे ही ऑपेरेशनल प्रोसेस. त्यांना मी सांगितले की, जर मी दहा हजार झोपड्या फुकट बांधून दिल्या तर मला दहा Tower फुकट बांधायला मिळतात, मला तितका एफ एस आय मिळतो आणि ते विकून मी पैसे मिळवतो. मग त्यांनी सांगितले की ओके मग तुम्ही इथे माझ्या देशात फ़्लट बांधा आणि विका. पण मी म्हटले इकडे तुमच्या देशात फ़्लट बांधले तर ते विकत कोण घेणार. सर तुमचा देश नुकताच स्वतंत्र झाला आहे, तुमचा प्रॉब्लेम जो आहे ते म्हणजे घर, मी ते दहा हजार घर तुम्हाला फुकट बांधून देईन, पण त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? मी कधी नाही म्हणालो, असे म्हणत मी आपली चूक दुरस्त करायला लागलो.
मग त्यांची आपआपसात चर्चा खलबत सुरु झाली, त्यात मधे एक तास गेला. येस आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला तयार आहोत. मी विचारले काय? आम्ही तुम्हाला २५ वर्षांच्या कराराने खाण चालवायला देत आहोत, दगडाची नाही मित्रांनो सोन्याची. कुठल्या कुठे गोष्ट गेली … ही ऑफर दुर्देवाने मला पुढे घेता आली नाही कारण त्यावेळी त्या देशात कायदा सुव्यवस्था परिस्थिती खराब होती.
पण यातून मला तुम्हाला काय सांगायचे आहे की तुम्ही हृदयापासून बोला नक्की काही ना काही घडणारच. संधी, प्रोब्लेम, आयुष्य हे असे काहीना काहीतरीच चालूच असणार यातूनच आपल्याला मार्ग काढत पुढे जायचे असते.
आयुष्य आपल्या रानातल्या झऱ्यासारखे आहे. रानातला झरा वाहतो कसा ते पहा, तो नागमोडी वाहतो. आयुष्य सुद्धा हे सरळ असूच शकत नाही, ते नागमोडीच असणार हे स्वीकारा. आयुष्य नागमोडी आहे म्हणूनच ते जीवन छान असते. रानातला झरा वाहतो तेव्हा तो काट्याकुट्यातून वाहत असतो. आपल्याही आयुष्यात काटे हे लागणारच, पुढे दगड धोंडे लागतात. रानातला झरा दगडधोंड्यातून वाहतान ठेचकाळत नाही तर सुंदर आवाज करत वाट काढून पुढे निघून जातो. पुढे मोठा धोंडा असतो पण तिथे तो थांबत नाही, पाणी एका जागी थांबले तर डबके होते. ते पाणी त्या मोठ्या धोंड्यापाशी थांबत नाही, वाट काढून पुढे निघून जाते. कारण त्याचे ध्येय असते पुढे जाऊन समुद्राला मिळायचे. आपल्या आयुष्यात सुद्धा असेच असते, आपल्या वाटेत दगड धोंडे, काटेकुटे असतील पण कुठेच थांबू नका, वाट काढून पुढे निघून जा. हा रानातला झरा त्याचा मार्ग तो स्वतःच शोधून काढतो कुणाची मदत घेत नाही. आपण व्यवसायवाले आहोत, आपला मार्ग आपणच काढायचा असतो. आपले संकटे आपणच दूर करायची आहेत, मुळात संकटाना संकट मानायचे नसते. असे आयुष्य ठेवा बघा यश दोन्ही हात जोडून तुमच्यासमोर येईल आणि यश तुम्हाला नकार देणार नाही.
आता जरा आपण प्रश्न उत्तरे घेऊयात…
प्रश्न - सर भांडवल कसे उभे करावे?
उत्तर - तुमच्याकडे १० ० रु असतील तर १०० रु चा माल भरा. आत बँकेकडे जाणार असाल तर बँकेकडे कसे जावे? १०० रु तुमचे, त्यानंतर तुमच्या आई वडील भाऊ यांच्याकडून ५ ते २५ रु घ्या. आत तुमच्याकडे झाले १२५ रु, मित्राकडे जा एका मित्राकडून २५, तर दुसऱ्या मित्राकडून २५ घ्या, थोडे थोडेच घ्या जास्त त्यांना त्रास देऊ नका.
आता समजा तुम्हाला २५ लाख भांडवल उभे करायचे आहे. तुमच्याकडे १ लाख आहेत. आई वडिलांनी तुम्हाला ५० हजार दिले. मित्रांकडे जा, एकाच मित्राच्या मागे ५ लाख मागत बसू नका. त्याला विचार किती देऊ शकतो? २ लाख देऊ शकतो तर ५० हजारच घ्या. उद्या ते परत देताना ते ५० हजार त्याला जड होत नाही, कारण त्याची २ लाख देण्याची कॅप्यासिटी होती. पुढे मागे देताना त्याला उशीर झाला तरी त्याला तितका त्रास होत नाही. पण समजा ५ लाख देण्याची त्याच्या बँकेत होते आणि तुम्ही ते सर्व घेतलेत, मग उद्या उशीर झाला तर प्रॉब्लेम तुमच्या मित्राचा होतो. मैत्रीमध्ये तो कदाचित म्हणेल अरे सर्व घेऊन जा, मैत्रीमध्ये पैसे महत्वाचे नाहीत. पण तसे करू नका, त्याला सुद्धा सेफ राहू द्या, थोडेच घ्या. एकाच माणसाकडून ५ लाख घेण्या ऐवजी १० मित्रांकडून ५० हजार घ्या.
मग आता समजा तुमचे १ लाख, आई वडिलांकडून घेतलेले ५० हजार व मित्रांकडून उभे केलेले ५ लाख असे एकूण सर्व ६ लाख ५० हजार घेऊन बँकेकडे जा. बँकेला सांगा मी एकूण लोन चे २५ टक्के उभे केले आहेत, वरचे १८ लाख तुम्ही टाका. माझ्याकडे इतके आहेत तुम्ही अजून टाका, बँका देतात. पुढे बँकेशी चांगले संबंध ठेवा, चांगला रेकॉर्ड ठेवा, व्याज वेळवर भरा.
प्रश्न - सर तुमचे हे उद्योजक होण्याच्या स्वप्नाची सुरवात कशी झाली?
उत्तर - मी नशीबवान आहे, शाळा सुटली की १२ वाजता घरी आलो की आता करायचे काय? वडील कामानिमित्त बाहेर गेलेले. आई सकाळीच स्वयंपाक करून एका लहान मुलांच्या शाळेत शिकवायला जायची. शाळेतून आल्यानंतर पुन्हा शिकविण्या घ्यायची, परत घरी आल्यानंतर शिवणकाम करायची असे दिवसभर कष्ट कष्ट कष्ट.
दुपारी १२ नंतर जेवण करून मग करायचे काय तर क्रिकेट खेळायचे. पण क्रिकेट खेळण्यासाठी ४ - ५ कमीत कमी मुल जमविणे आलेच. मग हे माझे मित्र कोण होते तर एकाची चण्यामण्याची गाडी, दुसऱ्याची सुपारीच्या पुड्या बांधण्याचे दुकान, तिसऱ्या मित्राचा टांगा होता, त्याचे वडील टांगा चालवयाचे. आणखी एक मित्र तो एका चहाच्या दुकानात कपबश्या धुवायचा. पाचव्या मित्राची रिक्षा होती व सकाळी पेपरची लाईन होती.
आता हे सर्व मित्र मंडळी जर खेळायला घेऊन जायचे, त्यांना विचारायला गेले कि त्यांचे आई वडील त्यांना म्हणायचे ‘ये शिकून, खेळून कोणाचे भले झाले चल ती गाडी लाव, चल त्या पुड्या बांध’ वेगरे वेगरे. आधी काम करा मग जा तुम्हाला कुठे खेळायला जायचे ते. आता माझे मित्र मला खेळायला हवे असतील तर मी काय करायचो? मी त्यांना मदत करायचो. त्या चण्यामण्याची गाडीवर जा, सुपारीच्या पुड्या बांधून दे, कपबश्या धुवायला मदत कर आणि पेपरची लाईन टाक. आता हे सर्व करायचो तर त्या मित्रांचे वडील मला एक दोन रु द्यायचे. अशा प्रकारे मित्रांच्या संगतीने मला लहानपणीच महिन्याला ३ ते ५ रु सहज कमवता येऊ लागले. अहो आमच्या लहानपणी चार रु म्हणजे खूप होते हो. त्यावेळी दिवाळीत बाबा आम्हाला ५ रु द्यायचे ४ भावंडांना मिळून फटाके आणण्यासाठी, मात्र एका दिवाळीला मीच बाबांना माझ्या जवळ जमलेले माझ्या मेहनतीचे २२ रु दिले. अशा प्रकारे मित्रांना मदत करता करता मी व्यवसाय शिकू लागलो, त्यात आवड घेऊ लागलो. लहानपणापासून मला कष्ट आणि भांडवल हे खऱ्या अर्थाने शिकायला अनुभवयाला मिळाले. मी खरच नशीबवान कि मला हे लहानपणापासून अनुभवता आले, नाहीतर शिकून पदवीधर झालो असतो व वडिलांनी मला, महाराष्ट्र बँकेत अथवा कॉसमॉस बँकेत चिकटवल असतं.
आणखी एक किस्सा म्हणजे मी जेव्हा चन्यामन्या विकायचो त्या वेळी माझ्यासमोर पण एक चन्यामन्या विकायचा. कुठ्ल्यायी धंद्यात स्पर्धा ही असायचीच, आमच्या दोघांच्या गाड्या सारख्याच सजलेल्या असायच्या. पण समोरच्या चन्यामन्या वाल्यापेक्षा माझे चन्यामन्या जास्त विकले जायचे त्याचे रहस्य म्हणजे समोरचा चन्यामन्या कळकट मळकट पायजमा घातलेला असायचा, त्याचे पूर्ण शरीर घामाने भिजलेले असायचे, दाढीचे खुंट वाढलेले … असा तो कळकट मळकट चन्यामन्या वाला आणि त्याच्यासमोर मी हाफ खाकी चड्डी, पांढरा शुभ्र अंगात शर्ट, केस निट विचारलेले असा नीटनेटका चन्यामन्या विकणार … साहजिकच मला सांगा कोणाचा माल जास्त विकला जाणार. मित्रांनो असे लहानपणापासून अनेक छोटेमोठे व्यवसाय करत मी पैसे कमवायला लागलो, काय काय नाही केले ते विचारा … अशा प्रकारे माझ्या उद्योजक होण्याच्या स्वप्नाला सुरवात झाली.
- डी. एस. कुलकर्णी -------------------------------------

Thursday, 16 April 2015

Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray




Was Balasaheb Thackeray Merely a Great Maratha or the Hero of Hindu Hearts?

But who was he really ? Do we go by the opinions of analysts who put him on par with political cartoonists like R.K. Laxman ? Or, barring Times Now, do we go by the opinion of the rest of the English news channels who unanimously declare him to be a socially divisive force ? Or in light of the several unnecessary statements he made about Belgaum, do we regard him—like many pro-Kannada voices say—as anti-Kannada? Or is he someone who filled the hearts of Maharashtrians with linguistic fanaticism ?

Or…

Is he the Hindu Hriday Samrat—the Emperor who rules the hearts of Hindus? What does the fact that no leader in the last four decades attracted such a massive sea of people who attended his funeral—after Gandhi, Nehru, and Ambedkar—indicate ? What did he truly symbolize ? Before we attempt to understand this, let’s recall an article written by Francois Gautier 12 years ago titled Are Hindus Cowards ? Gautier holds a mirror to the cowardice and stupidity of Hindus in the piece and holds only one person in very high esteem. Who do you think that person is ?

What happens when there is ONE man in India — whatever his faults, quirks, or excesses — who dares to call a spade a spade, is not afraid of words and is ready to stand-up for his opinions ? Not only, of course, is he attacked by Christians and Muslims, but he is also hounded by his own brothers and sisters, the "secular" Hindus, the human rights activists, the journalists, the police, the (Congress) politicians! Are Hindus so intent to show the world that not only are they cowards but also idiots ? This man, of course, is Balasaheb Thackeray.

When Balasaheb Thackeray said many years ago that there was no point in playing cricket against Pakistan as long as Islamabad was sending militants to kill and maim into Indian territory, he was ridiculed by the secular press as fanatic and un-sportive (and cricket is certainly not a gentleman’s game, as the recent scandal has shown). But he was proved right, when during Kargil, India refused — for once — to play cricket with Pakistan.

When he says too, that since 14 centuries, Muslims always strike first against Hindus, he has another good point, for those who live in Indian cities which have important Muslim minorities will tell you that every time there are Hindu-Muslim riots, it is the Muslims who start them, either by attacking the police, or by provoking the Hindus.

And as Francois Gautier says, the man who fearlessly called a spade a spade is none other than Bala Keshav Thackeray.

The fact that he used to admire the German dictator, Adolf Hitler was a topic that was endlessly discussed and criticized even on the occasion of Balasaheb Thackeray’s Last Journey. However, when we trace Balasaheb Thackeray’s career, the reason for his Hitler-admiration becomes clear. After it was humiliatingly defeated in the First World War in 1919, the America-Britain combine foisted the Treaty of Versailles, thereby adding salt upon an already wounded Germany. Hitler simply roused the pride of Germans against this injustice. Additionally, he was one of the most forceful orators in history.

In 1960, the state of Maharashtra came into existence thanks to the linguistic reorganization scheme. Efforts were on to slice Bombay off from Maharashtra. It was then that Balasaheb Thackeray rose up and thundered that Bombay would burn if any attempt was made to cut it off from Maharashtra. He was, like Hitler, a fierce orator. Back then, Bombay was filled with Gujaratis, Parsis, and South Indians, not too different from today. The perception of Maharashtrians was that they were a lazy lot. It was Balasaheb Thackeray who instilled self-respect and pride in middle-class Maharashtrians, a no mean task. Let’s also recall that in that period, the entire state was divided along caste lines. It was a period when the names of stalwarts like Jyotiba Pule, Sahu Maharaj and Ambedkar dominated the social and political firmament. The fact that Balasaheb Thackeray gave this an entirely new dimension by uniting all Maharashtrians under the banner of Shivaji Maharaj should count as an exemplary accomplishment.

This period also saw the birth and flowering of militant trade unionism of the Left variety. Bombay was then home to the maximum number of textile mills in the country. The plight of hundreds of thousands of workers was truly pitiable. And therefore, in such an atmosphere, anybody who spoke on behalf of these mill workers became a hero. Workers’ Unions were formed and they were mostly controlled by Leftists. However, even in such circumstances, it was only Balasaheb Thackeray who ensured that Bombay didn’t fall into the violent clutches of these Leftist Trade Unions. It was Balasaheb Thackeray who ensured that the Left parties didn’t win a single election.

Today, it’s unfair to judge Balasaheb Thackeray merely on the basis of some politically-expedient statements he issued with regard to Belgaum. If anything, his worldview transcended the narrow confines of caste, region, and language. The example of Sanjay Nirupam, a Bihari, comes to mind. He was first elected as an MP on a Shiv Sena ticket. If Balasaheb Thackeray was indeed the fanatical linguistic leader he’s portrayed to be, would he step in and rescue Sikhs in 1984? In the wake of Indira Gandhi’s assassination, Sikhs were attacked in almost all parts of India. Delhi alone witnessed the genocide of more than 3000 Sikhs. However, in Bombay not one Sikh was harmed thanks to Balasaheb Thackeray who issued a stern warning against any such attempt, yet another demonstration of the extent of his power.

The Mandal conflagration that erupted between 1989-91 saw a lone dissenter in the form of Balasaheb Thackeray who opposed the vile, caste-based reservations aimed at perpetuating V.P. Singh’s power. This dissent despite the fact that backward castes make up about 70% of the Shiv Sena cadre. Not just this. The fact that he managed to triumph in the 1995 assembly polls shows that he was able to digest this dissension.

In 2007, Arnab Goswami in an interview asked Balasaheb Thackeray, “Because some Muslims are involved in terrorism, how fair is it to tarnish the entire community?” To which, Thackeray’s gutsy reply was:
“Why don’t you question those who in 1948, set fire to the houses of Brahmins because Nathuram Godse was a Brahmin?” And, “If all of us accept that we are the citizens of one nation, where does the question of minorities come from?”
Only Bal Thackeray possessed this kind of defiant courage.

Whatever pseudo secularists may harp about Shiv Sena, it is a fact that this organization is responsible for reducing and containing the perverse phenomenon of vulgar eve-teasing in Bombay. Even as we speak, Shiv Sena continues to assist poor people by providing them with free ambulance services and blood donations. Additionally, Balasaheb Thackeray to a great extent acted as a bulwark to check the excesses of underworld gangsters like Dawood Ibrahim, Chota Shakeel and Chota Rajan.

The fact that the people of Bombay have repeatedly elected the Shiv Sena (and later the Shiv Sena-BJP combine) in the Municipal Elections since 1985 is a testimony to the faith they continue to repose in them. The Washington Post in one of its pieces wrote that Balasaheb Thackeray was the man “who rules Bombay the way Al Capone ruled Chicago—through fear and intimidation.” If that were indeed true, why would 20 lakh people—almost 1/5th the population of Bombay—attend his funeral? The last time India witnessed this kind of crowd was when the likes of Gandhi, Nehru and Ambedkar passed away.

As Gautier says, Balasaheb Thackeray was the only man who called a spade a spade and had the pluck to stand by his statements. In 1992 when the Babri Masjid was destroyed in Ayodhya, Atal Bihari Vajpayee acted as if the sky had fallen down upon him. And later, L.K. Advani cravenly wailed before the Liberhan Commission that “December 6 was the saddest day of my life.” However, it was only Balasaheb Thackeray who said that
“if the Babri Masjid was broken down by Shiv Sainiks, I would have been proud of them!”
It was only Balasaheb Thackeray who had the gumption to declare that
“the only way to defeat the rising threat of Islamic terrorism is to counter it with strong Hindus.
” If these things don’t make him the Hindu Hriday Samrat, nothing else does.

To quote Gautier again,
“’Arise O Hindus, stop being cowards, remember that a nation requires Kshatriyas, warriors, to defend knowledge, to protect one’s women and children, to guard one’s borders from the enemy….And do Indians need a Balasaheb Thackeray to remind them of that simple truth?”


Yes, Indians definitely do need him. But sadly, he is no more!

Writer: Hindu Janjagruti Samiti


Thursday, 22 January 2015

हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख, मा. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन !!



हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख, मा. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन !!
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे २३ जानेवारी १९२७ : शिवसेनाप्रमुखांचा पुणे येथे जन्म. शालेय जीवनातच चित्रकलेची प्रचंड आवड, खासकरून व्यंगचित्राची. १९४५ : ‘फ्री प्रेस जर्नल’ या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये ‘कार्टुनिस्ट’ म्हणून काम सुरू केले. १४ जून १९४८ : शिवसेनाप्रमुखांचा विवाह कु. सरला वैद्य यांच्यासोबत झाला. १९५० : ‘संयुक्त महाराष्ट्राची चळवळ’ सुरू झाली. ‘नवशक्ती’ व ‘फ्री प्रेस जर्नल’व्यतिरिक्त अन्यत्र ‘मावळा’ या नावाने व्यंगचित्राद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सामर्थ्य देण्याचे काम केले. १३ ऑगस्ट १९६० : मराठीतील पहिले ‘व्यंगचित्र’ साप्ताहिक ‘मार्मिक’ची बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या समवेत सुरुवात. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन. ‘मार्मिक’ टिप्पणी करत साकारलेल्या व्यंगचित्रांसोबत ‘वाचा आणि थंड बसा’ असा उपरोधिक मथळा देऊन मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केले. १९ जून १९६६ : शिवसेनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवाजी पार्क येथील छोट्याशा घरात करण्यात आली. मराठी माणसाच्या-भूमिपुत्राच्या न्याय्य हक्काचा लढा सुरू झाला. ३० ऑक्टोबर १९६६ : शिवसेनेची पहिली जाहीर सभा शिवतीर्थावर संपन्न झाली. या वेळी व्यासपीठावर प्रबोधनकार ठाकरे, रामराव आदिक होते. ‘मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे धोरण शिवसेनेने अंगिकारले. १९६७ : शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली निवडणूक सामोरी आली ती ठाणे नगरपालिकेची. शिवसेनेचा प्रचंड विजय. ठाणे नगरपालिकेने शिवसेनेस पहिला ‘नगराध्यक्ष’ देण्याचा मान मिळविला. ९ ऑगस्ट १९६८ : कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘भारतीय कामगार सेने’ची स्थापना. १९६९ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी रणशिंग फुंकले. शिवसेनाप्रमुखांना अटक. मुंबई पेटली. १९६९ : शिवसेनाप्रमुखांना ३ महिने कारावास. आंदोलनात ६९ तरुणांनी बलिदान केले. ५ जून १९७० : ‘परळ विधानसभा’ पोटनिवडणुकीत १० पक्षांच्या आघाडीचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार वामनराव महाडिक यांचा विजय. महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून गेले. १९७१ : मुंबई महानगरपालिकेत डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर विराजमान झाले. १९७२ : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रमोद नवलकर विजयी. १९७२ : सरकारी/निमसरकारी कार्यालये आणि खाजगी कंपन्यांच्या कार्यालयातील नोकरभरतीत मराठी माणसांना-भूमिपुत्रांना प्राधान्य मिळविण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी ‘स्थानीय लोकाधिकार समिती’ची स्थापना. २० नोव्हेंबर १९७३ : प्रबोधनकार ठाकरे यांचे निधन. १९७५ : आणीबाणीस पाठिंबा. १९ जून १९७७ : दादर येथे शिवसेना भवनाचे उद्घाटन. १९७८ : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार पराभूत. मुंबई महापालिकेतही पराभव. शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा. परंतु शिवसैनिकांच्या आग्रहास्तव राजीनामा मागे. १९८५ : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय. छगन भुजबळ महापौर. १९८७ : हिंदुत्वाची भूमिका घेऊन ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा दिली. याच विचारावर विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक लढविली. मुंबईचे तत्कालीन महापौर डॉ. रमेश प्रभू यांचा विजय. २३ जानेवारी १९८९ : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू. संपादक : बाळासाहेब ठाकरे. १९८९ : लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती झाली. शिवसेनेचे ४ उमेदवार विजयी झाले. प्रथमच लोकसभेत प्रवेश. १९९० : शिवसेनाप्रमुखांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या अमोघ वाणीने झंझावात निर्माण केला. शिवसेनेचे ५२ उमेदवार विजयी झाले. ६ डिसेंबर १९९२ : अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी याची जबाबदारी झटकली. अखेर हे काम शिवसैनिकांनी केल्याचे म्हटले गेले, त्यावर शिवसेनाप्रमुखांनी “हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान वाटतो” असे धाडसी उद्गार काढले. १९९२-९३ : मुंबईत दंगल उसळली. अखेर शिवसेनेमुळे तमाम हिंदूंचे रक्षण झाले अशी भावना सर्वत्र झाली. १९९५ : शिवसेना-भाजपा युतीने महाराष्ट्र राज्याची सत्ता काबीज केली. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर झाला. १९९७ : मुंबई महानगरपालिकेवर विजय. १९९८ : लोकसभा निवडणुकीत एन.डी.ए.चा विजय. शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात आले. ११ डिसेंबर १९९९ ते १० डिसेंबर २००५ : हिंदुत्वाच्या प्रचाराच्या मुद्यावरून ६ वर्षे शिवसेनाप्रमुखांवर मतदान करण्यास बंदी घातली गेली. २० एप्रिल १९९६ : ज्येष्ठ सुपुत्र बिंदुमाधव यांचे अपघाती निधन. ६ सप्टेंबर १९९६ : धर्मपत्नी माँसाहेब – मीनाताई ठाकरे यांचे निधन. २००३ : महाबळेश्वर येथील शिबिरात उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. २००७ : शिवसेनेचा मुंबई आणि ठाणे महापालिकेवर पुनश्च विजय. २०१० : युवा सेनेची स्थापना. आदित्य ठाकरे यांच्याकडे युवा नेतृत्वाची धुरा. १७ नोव्हेंबर २०१२ : मुंबई येथे ‘मातोश्री’ मुक्कामी परलोकी प्रयाण.

हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख, मा. बाळासाहेबांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Wednesday, 21 January 2015

खुशखबर! व्हॉट्सअॅपची मजा आता डेस्कटॉपवरही


मुंबई : व्हॉट्सअॅप युझर्ससाठी एक चांगली बातमी आहे. स्मार्टफोनवर वापर केल्या जाणाऱ्या या अॅप्लिकेशनची मजा आता डेस्कटॉपवरही मिळणार आहे. इंस्टंट मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅप जगभरात प्रसिद्ध आहे. व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या 50 कोटींच्या पार पोहोचली आहे, यावरुनच त्या अॅपच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. व्हॉट्सअॅप युझर्स बऱ्याच काळापासून ही सेवा डेस्कटॉपवर करण्याची मागणी करत होते. आता व्हॉट्सअॅपने युझर्सना ही भेटही दिली आहे. व्हॉट्सअॅपने नवी सेवा 'व्हॉट्सअॅप वेब' लॉन्च केली आहे. व्हॉट्सअॅपचे संस्थापक जैन कॉम यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे ही, "आजपासून पहिल्यांदाच लाखो युझर्स आता हे अॅप वेब ब्राऊजरवर वापरु शकतात. व्हॉट्सअॅप वेब फोनअॅपचंच ही अपडेट आहे. व्हॉट्सअॅप वेबवरही युझर्स फोनमधील मेसेज वाचू शकतात. याचा अर्थ असा की, युझर्सचे मेसेज ब्राऊजरसह फोनवरही उपलब्ध असतील." कसं वापराल 'व्हॉट्सअॅप वेब'? डेस्कटॉप व्हॉट्सअॅप सुरु करण्यासाठी युझर्सना गूगल क्रोम ब्राऊजरमध्ये https://web.whatsapp.com ही लिंक ओपन करावी लागेल. त्यानंतर एक QR कोड स्कॅन युझरच्या डेस्कटॉप स्क्रीनवर दिसेल, ज्याद्वारे युझर मोबाईल व्हॉट्सअॅप स्कॅन करु शकतात. यासाठी युझरकडे व्हॉट्सअॅपचं अपडेटेड व्हर्जन असणं आवश्यक आहे. मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपच्या मेन्यूमध्ये जाऊन 'व्हॉट्सअॅप वेब' ऑप्शनमध्ये गेल्यावर युझर हा कोड स्कॅन करुन सहजरित्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतील. कोणाला वापरता येणार 'व्हॉट्सअॅप वेब'? सध्या अँड्रॉईड, ब्लॅकबेरी आणि विंडोज फोन यूजर्झच व्हॉट्सअॅप वेबचा आनंद घेऊ शकतात. डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी युझरचा फोन इंटरनेटशी कनेक्ट असणंही गरजेचं आहे. अॅपल आयफोन युझर डेस्कटॉपवर गूगल क्रोमशिवाय दुसरं ब्राऊजर वापरत नसतील तर त्यांना व्हॉट्सअॅप वेब वापरता येणार नाही.

Friday, 10 October 2014

लोककल्याणकारी राजा - छत्रपती शिवाजी महाराज

लोककल्याणकारी राजा - छत्रपती शिवाजी महाराज
रयतेच्या कल्याणाची काळजी घेणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा नाही. स्वराज्यातील शेतकरी, गोरगरीब यांच्या हिताची त्यांना असलेली तळमळ त्यांच्या कारभारातून, पत्रांतून दिसून येते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या या लोकोत्तर राजाच्या जयंतीनिमित्त. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे समतेचे, रयतेचे राज्य होते. त्यांची लढाई मुघल- आदिलशहाविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती, धार्मिक नव्हती. त्यांच्या सैन्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर मुस्लिमही होते. त्यांच्या राज्यात भेदाभेद नव्हता. त्यामुळेच महात्मा जोतिराव फुले शिवरायांना "कुळवाडीभूषण' म्हणतात. शिवरायांनी शत्रूंच्याही स्त्रियांचा आदर केला. बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांचा महाराजांनी सन्मान केला होता. महाराजांना शेतकऱ्यांबद्दल किती प्रेम होते, हे त्यांनी चिपळूण येथील जुमलेदार आणि हवालदार यांना 19 मे 1673 रोजी पाठवलेल्या पत्रावरून स्पष्ट होते. ते म्हणतात, ""....रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही....'' रयतेच्या दाणे, भाकर, गवत, फाटे, भाजीपाला यांना हात लावू नका, अशा कडक सूचना शिवरायांनी दिल्या होत्या. याच पत्रात महाराज पुढे सांगतात, "पावसाळा जवळ आलेला आहे. चारा, धान्य काटकसरीने वापरा. चारा आता संपवलात, तर पावसाळ्यात घोड्यांना चारा मिळणार नाही. मग घोडी तुम्हीच मारली, असे होईल. धान्य संपले, तर शेतकऱ्यांकडील दाणे, भाकरी, गवत, जळण, भाजीपाला आणाल. तेव्हा रयत म्हणेल, की मुघलापेक्षा तुम्ही जास्त त्रासदायक आहात. उन्हाळा असल्यामुळे आगट्या, चुली, रंधनाळा प्रसंगी आग भडकेल आणि खणाला (लाकडाला) लागेल. त्यामुळे लाकूड मिळणार नाही. रात्रीस दिवा घरात असेल, उंदीर दिव्याची वात नेईल. आग भडकेल, ते गोष्टी न हो, या करणे हमेशा फिरत जाऊन काळजी घेणे. सर्वांनी हुशार राहणे. जनावरांची आणि शेतकऱ्यांची काळजी घ्यावी, अन्यथा मराठियांची इज्जत वाचणार नाही.'' शिवरायांनी मावळ्यांना काटकसर करून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यास सांगितले. घोडी मरू नयेत, आग लागू नये, याबाबत घ्यावयाची काळजी म्हणजे शिवरायांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मावळ्यांना दिलेले धडे आजही मार्गदर्शक आहेत. शिवरायांचे आपत्ती व्यवस्थापन आदर्शवत आहे. आग लागल्यानंतर घ्यावयाची काळजी नव्हे, तर आगच लागू नये यासाठी करावयाचे नियोजन, असे त्यांचे आपत्ती व्यवस्थापन होते. आग लागून लाकूड आणि चारा जळाला, तर मराठ्यांची इज्जत राहणार नाही, असे महाराज म्हणतात. प्रजेचे, जनावरांचे, पर्यावरणाचे रक्षण हीच मराठ्यांची इज्जत, अशी त्यांची भूमिका होती. प्रांताधिकाऱ्यांची वागणूक रयतेबाबत कशी असावी, याबाबतचे पत्र शिवरायांनी 5 सप्टेंबर 1676 रोजी लिहिलेले आहे. त्यात महाराज म्हणतात, ""...इमाने इतबारे साहेबकाम करावे येसी तू क्रियाच केलीच आहेस. तेणेप्रमाणे येक भाजीच्या देठास तेही मन दाखविता रास व दुरुस वर्तणे... रयतेवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवर राजी नाहीत येसे बरे समजणे... कष्ट करून गावचा गाव फिरावे..ज्या गावात जावे तेथील कुलबी (कुणबी) किती आहेत ते गोला करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणूसबल आसेली, त्या माफीक त्या पासी बैलदाणे संच आसीला तर बरेत जाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे, माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर, पोटास दाणे नाही, त्या वीण तो आडोन निकामी जाला असेल, तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दोचो बैलाचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खडि दोन खडि (खंडी) दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल, तितके करवावे. पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैके वाढीदिडी (व्याज- चक्रवाढ व्याज) न करिता मुदलच उसनेच हळूहळू याचे तवानगी माफीक घेतघेत उसूल घ्यावा...'' म्हणजे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अन्यथा गय केली जाणार नाही. कष्ट करून म्हणजे कंटाळा न करता गावोगावी जाऊन रयतेच्या समस्या पाहा. ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडी, धान्य नाही, त्याला बैलजोडी घेण्यास पैसे द्या. खंडी- दोन खंडी धान्य द्या. त्यासाठी दोन लाख लारी खर्च झाला तरी चालेल; पण शेतकऱ्यांकडून बिनव्याजी मुद्दलच, तेही तो ऐपतवान झाल्यावर वसूल टप्प्याटप्प्याने करावे, अशा सूचना शिवरायांनी दिल्या होत्या. शिवरायांचे स्वराज्य भ्रष्टाचारविरहित, श्रमकऱ्यांचे हित जोपासणारे होते. त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले; पण कर्जाचा व्याजदर शून्य टक्के होता, हे वरील पत्रावरून सिद्ध होते. त्याच्या वसुलीसाठी तगादा लावला नाही. शेतकऱ्यांना बैलबारदाना तर दिलाच, पण त्याच्या पोटासाठी खंडी- दोन खंडी धान्यही दिले. शेतीसाठी अनुदान देऊन उत्पादनात आणि शेती व्यवसायात प्रगती साधण्याचा शिवरायांचा प्रयोग अनुकरणीय आहे. सध्या जागतिकीकरणाच्या युगात आपल्या शेतकऱ्याची स्पर्धा विकसित देशांतील शेतकऱ्यांशी सुरू आहे. आजही शेतकऱ्याला स्वतःची गुंतवणूक करूनच शेती करावी लागते; पण साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा मोफत पुरवठा केला. त्यांना बैलजोडी घेऊन दिली. शेतकऱ्यांच्या पोटाला अन्न दिले. बिनव्याजी कर्ज दिले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. त्यासाठी तिजोरीवर बोजा पडला, तरी पर्वा केली नाही. आज महाराष्ट्रातील बहुतांश भाग दुष्काळाने होरपळत आहे. अशा काळात शिवरायांचे कृषिधोरण शासन- प्रशासनाला मार्गदर्शक आहे. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, विनामोबदला काही घेऊ नका, असे सांगताना यातून शिवरायांची रयतेप्रती असणारी कनवाळू भूमिका प्रकर्षाने जाणवते. शिवरायांनी जमीन महसूल व्यवस्थेत आमूलाग्र क्रांती केली. जमिनीची पाहणी करून मोजणी केली, प्रतवारी ठरवली. आग्र्यावरून परतल्यानंतर शिवरायांनी सुमारे तीन वर्षे कृषी व्यवस्थेच्या सुधारणेसाठी खर्च केली. शिवकालीन पाणी साठवण योजना ही आजही त्यांच्या जल व्यवस्थापनाची साक्ष देत आहे. शिवरायांचा इतिहास केवळ ढाल- तलवारींचा आणि लढा यापुरता मर्यादित नाही, तर त्यांनी सर्वोत्कृष्ट कृषिधोरणाचा पाया घातला. रचनात्मक प्रशासन व्यवस्था निर्माण केली. त्यामुळेच साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांच्या कार्याचे महत्त्व कायम आहे. राजे एका आज्ञापत्रात सांगतात, ""लाकूडफाटा तोडू नका. सागाची आणि आंब्याची झाडे अत्यंत उपयुक्त, ती एका सालात पैदा होत नाहीत. त्यांची जोपासना करावी. गडावरील पालापाचोळा खाली लोटू नका. तो एकत्र करून जाळावा व त्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करावी.'' औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंह, सिद्दी जोहर यांच्याशी संघर्ष करतानाच्या काळातही आपल्या प्रजेची हेळसांड होणार नाही, याची दक्षता शिवरायांनी घेतली. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली; पण ते हतबल, निराश, नाउमेद झाले नाहीत. शौर्य, धैर्य, औदार्य या गुणांच्या बळावर महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य केवळ एका जातीचे, धर्माचे, पंथाचे, प्रांताचे वा भाषेचे नव्हते तर ते रयतेचे, लोककल्याणकारी राज्य होते. त्यामुळेच शिवरायांच्या राजमुद्रेत म्हटले आहे. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्‍ववंदिता। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।। अर्थ - प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची ही विश्‍वाला वंदनीय अशी मुद्रा लोककल्याणार्थ शोभत आहे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक
हार्दिक शुभेच्छा !!